लाभ मिळवण्यासाठी केवायसी करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी
शेतकरी होळकर कर्जमुक्ती योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. शुक्रवारी (दि. २४) भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात गेल्या दहा वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा मोठी कर्जमाफी देण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
जिल्ह्यात १.८० लाख शेतकरी पात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकऱ्यांपैकी एकूण १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत. त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम १६३२ कोटी १२ लाख रुपये इतकी आहे.
यावेळी आमदार सुहास शिरसाठ, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, नगरसेवक
जुनी थकबाकीही माफ
४८ कर्जमाफीची एकूण रक्कम ३६ हजार कोटी ५८५ रुपये इतकी असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीज बिल आकारले जात नाही, मात्र त्यांची वीज वापराची कोटींची जुनी थकबाकीही आता माफ करण्यात आली आहे, असेही मंत्री सावे यांनी सांगितले. दरम्यान, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन माजी खासदार डॉ. कराड यांनी केले.
हर्षवर्धन कराड, छाया खाजेकर, यज्ञेश बसैये, धनंजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सावे म्हणाले की, या योजनेत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच्या
योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी शेतकऱ्यांचा लाभ मिळत नव्हता. मात्र या नव्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












